खास पालकांसाठी…खरे आणि खोट्याचे तारतम्य..

-
girls-462072_1920

आमच्या शेजारी जिया नावाची गोंडस, हुशार आणि चुणचुणीत मुलगी तिच्या परिवारासह भाड्याने राहत होती. त्यांच्या घरमालकला देखील एक गोड नाती होती. रिया व जिया जोडी नेहमीच खेळत असायची. दोघींना एकमेकाशिवाय करमायचे नाही.

पण त्यामध्ये रिया अतिशय खोडकर ! ती नेहमी एकतर जियाला चावायची किंवा चिमटे काढायची आणि जिया रोज अशीच घरी रडत रडत जात असे. तिची आई तिचे समजूत काढे आणि मग जोडी परत खेळू लागे.

एक दिवस अशीच जिया रडत रडत घरी आली आणि म्हणाली,” आई, मला रिया ने मारलं.” जिया ची आई भाजीला फोडणी टाकता टाकता पटकन म्हटली ,” मग तू का नाही मारत तिला.” तिच्या आईला जाणीव सुधा नव्हती की ती काय बोलून गेली आणि तिला उद्या कुठल्या परिस्थिला सामोरे जावे लागणार आहे.

जियाने मात्र हे मम्मी चे हे वाक्य पक्के लक्षात ठेवले. दुसर्‍या दिवशी खेळता खेळता रिया ने खोडी काढल्यावर जियाने रियाला चांगलेच बोचकारले ! आणि रिया च्या आई ने विचारल्यास बेधडक पाने संगितले ,” आई नेच मला संगितले असे करायला.”

आता जिया च्या घरी रिया ची आई आली आणि म्हणाली ,” काय हो, तुम्ही तुमच्या मुलीला रियाला बोचकायला शिकवता का ?“ जियाच्या आईला काहीच कळेना.

तिने जियाकडे बघितले असता जिया म्हणाली ,”तूच तर मला काल संगितले ना, रिया ने मारले तर तू पण मार.” हे ऐकताच जियाची मम्मी ला खूपच ओशाळल्या सारखे झाले.

तिला काही सुचेना काय बोलावे ! ती रियाच्या आईला म्हणाली ,” अहो ताई, तिला काही कळतं का ती काय बोलते ते. तुम्ही तिच्या बोलण्या कडे लक्षं देऊ नका. ती खोटं बोलत असेल.”

मित्रांनो हा खूप छोटा किस्सा’ असेल आपल्यासाठी. पण दोन मोठी शिकवण शिकवणारा.

गमतीत सांगायचा तर आपण पालक म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा खूप जागरुतेने बोलावे. तुम्ही कधी स्वप्नात ही विचार करणार नाही अश्या ठिकाणी आपल्याला आपली गोंडस मुलं नेऊन पोहचवतील. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर, आपली मुलं खूप निष्पाप असतात. कधी कधी आपण आपल्या भौतिक जगातल्या नाती जपण्यासाठी, आपल्या भौतिक स्वप्नांसाठी आपल्याच मुलांना खोटं ठरवतो.

जसे जिया च्या आईने घरमालकांसोबत नातं जपण्यासाठी जियाला खोटं ठरवलं, तसच आपल्या ही आयुष्यात असे खूप प्रसंग समोर येतील जेव्हा आपल्याला आपल्याच मुलांना खोटं ठरवावा लागेल. परंतु तेव्हा एक गोष्टा नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही असे करून तुमच्या मुलांचे भाव विश्व गोंधळात टाकू शकतात. त्यामुळे त्यांना कळणारच नाही की कधी खरे बोलावे व कधी खोटे बोलावे. त्यांना नैसर्गिक व निरागस आयुष्यं जगू द्या.

Photo credit: Image by Cheryl Holt from Pixabay

Do share with us incidences in your life where the innocence of a kid got hampered and on realisation how you dealt with it… We all can learn from this so that we can let our children learn best practices.

NaughtyKids

submit stories to stories@naughtykids.in

NaughtyKids:Fun forever!

Marathi
Leave a Response