चिव चिव चिमणी करिते गुंजन,स्वर हा कानी घुमतो छान।

चिव चिव चिमणी करिते गुंजन, स्वर हा कानी घुमतो छान।।
रम्य ही पहाट उगवली,,
उठा लवकर सांज खुलली,।।
नभी तांबूस ही छटा फुलली,
उगवतीचे रंग उधळू लागली।।
भास्कर ही हलकेच डोकवू लागे,
नवा दिवस उगवला सांगे।।
नवचैतन्याची लकेर उधळत ,
आनंदाचे क्षण अनुभवत।।
चिव चिव चिमणी करिते गुंजन,स्वर हा कानी घुमतो छान।
कामात हा दिन सरून जाई,
शांत असे मावळतीचे रंग घेऊन येई।।
भास्कर ही हळूच लोपला,
रात्र झाली सांगून गेला ।।
पुनश्च त्या उगवत्या दिनाची मजा,
मनी स्वप्न बाळगून निर्धास्त निजा।।
चिव चिव चिमणी करिते गुंजन,स्वर हा कानी घुमतो छान।
कविता सौजन्य : सौ,निलीमा कोल्हे
Photo credit: Image by Oldiefan from Pixabay
Do share your creativity for kids or kid’s creativity with us and make others smile with it.
Leave a Response
You must log in to post a comment.